राज्यात भाजप शिवसेना युतीचं सरकार येऊन अवघे तीन महिने झालेत..अशातच सरकारमध्ये शक्तिमान कोण यावरून वाद रंगलाय.. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मी शक्तिमान मुख्यमंत्री आहे असं म्हटलय...त्यांनी हा इशारावजा संदेश कोणा-कोणाला उद्देशून दिलाय.”मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दस्तुरखुद्द नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचाच आशिर्वाद असल्यानं ते सध्यातरी सर्वशक्तीमान मुख्यमंत्री असल्याचं सांगत आहेत.. भाजपमधल्या सर्व श्रेष्ठांना आणि ज्येष्ठांना डावलून फडणवीस यांच्याच गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडल्यानं एकनाथ खडसे, नितीन गडकरी, विनोद तावडे, सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुंडे यांच्यासह अनेकांचा भ्रमनिराश झाला..पण थेट मोदी-शहांचाच वरदहस्त असल्यानं आवाज करण्याची कोणाचाही हिम्मत झाली नाही..आत्ताही एकनाथ खडसे कधी जाहीरपणे तरी कधी पडद्याआड त्यांची नाराजी व्यक्त करतातच. पण भाजपचे इतर नेत्यांची अवस्था मात्र तोंड दाबून लाथा बुक्क्यांचा मार अशीच झालीय. ते बिचारे उघडपणे त्यांची नाराजीही व्यक्त करू शकत नाहीत..पक्षांतर्गत हा विरोध असताना दुस-या बाजूला शिवसेनेचाही मोठा विरोध फडणवीस यांना पत्करावा लागतोय..अशात फडणवीस यांनी मात्र मी शक्तीमान मुख्यमंत्री आहे असे संकेत आणि इशारा दिलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकाच वेळी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांना हा संदेश दिलाय.त्यांचा हा संदेश काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना जसा आहे तसाच तो गल्लीत म्हणजे मातोश्रीवर निर्णय घेत नाही असा सुचक इशारा उद्दव ठाकरेंनाही आहेच...तर दिल्लीत निर्णय घेत नाही याचा अर्थ पंतप्रधान मोदी, अमित शहा किंवा नितीन गडकरींनाही विचारून निर्णय घेत नाही असचं त्यांना सुचवाचय...शिवसेना हा भाजप सरकारचा सहकारी पक्ष असला तरी निर्णय प्रक्रियेचे सर्वाधिकार आपल्याच हाती आहेत. त्यामध्ये शिवसेनेचेचा अडथळा असणार नाही असा स्पष्ट संकेतही मुख्यमंत्र्यांनी दिलाय...राज्यात शिवसेना-भाजपचं सरकार येऊन अवघे तीन महिने झालेत. असं असताना मुख्यमंत्र्यांनी असा इशारा देण्यामागं काही कारणंही आहेत. आधी युती तोडून भाजपनं शिवसेनेला एकटं पाडलं होतं. त्यानंतर सत्तेत सहभागी करुन घेण्यासाठी शिवसेनेला जागा दाखवून दिली..कधी नव्हे एवढा पाणउतारा भाजपनं शिवसेनेचा केला. त्याची मोठी सल शिवसेनेच्या मनात आहेच. त्यामुळंच जेंव्हा जेंव्हा संधी मिळेत तेव्हा शिवसेना भाजपला कात्रजचा घाट दाखवण्याची संधी सोडत नाही. हा सामना रंगतच जाणाराय. सत्तेत राहुनही शिवसेना भाजपला वेळीवेळी विरोध करण्याची संधी सोडत नाही. आताही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी राज्यातल्या कायदा सुवस्थेच्या प्रश्नावर चिंता व्यक्त केली होती..गृहमंत्रिपद हे मुख्यमंत्र्यांकडेच आहे..त्यातच नागपूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या घराजवळ दिवसाढवळ्या खून झाला..हा धागा पकडत उद्धव यांनी मुख्यमंत्र्यांना घरचा आहेरच दिलाय..उद्धव ठाकरे फक्त कायदा सुव्यवस्थेवरच चिंता करुनच थांबले नाहीत तर उसाच्या प्रश्नावरही त्यांनी वेगळी भूमिका मांडली.. शिवसेना शेतक-यांच्या पाठीशीच आहे. सत्तेत असलो तरीही आणि सत्तेत नसलो तरीही असं म्हणून त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टींची पाठराखणही केली. एकीकडे शेतक-यांची सहानुभूती मिळवायची, दुसरीकडं भाजपकडे झुकलेल्या मित्रपक्षांना पाठिंबा द्यायचा आणि थेट सरकारवर हल्ला करायचा अशी नितीच शिवसेनेनं आखल्याचं दिसतय. देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर अशी आव्हानात्मक परिस्थिती आहे. म्हणूनच त्यांनाही परिस्थितीचा अंदाज घेऊन सर्वांना सूचक इशारा दिलाय. त्यांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारलेत. ते जरी मीच सर्वशक्तीमान असल्याचं सांगत असले तरी त्यांना सरकार चालवणं एवढं सोपं नाही. शिवसेनेला जरी त्यांनी इशारा दिला असला तरी शिवसेनाही काही गप्प बसणार नाही..संधी मिळेत तेव्हा शिवसेना मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणण्यास कमी करणार नाही...मुख्यमंत्र्यांना पक्षांतर्गत विरोधकही काही कमी नाहीत..एकनाथ खडसे, मुनगंटीवार,विनोद तावडे हे शांत बसून मुख्यमंत्र्यांना काम करु देतील असं वाटत नाही....
Tuesday, February 3, 2015
Sunday, February 1, 2015
पराभवातून राज ठाकरे कसे सावरणार...
मनसेच्या गडाला खिंडार
.... घर फिरलं की घराचे वासेही फिरतात असं म्हंटलं जातं...त्याची प्रचिती मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना सध्या येतेय...लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानं पक्षात निराशेचं वातावरण आहे...म्हणूनच की काय मनसेच्या तीन आघाडीच्या विकेट्स पडल्या....राज ठाकरेंचे निष्ठावान त्यांना का सोडून गेले जातात त्याचा आता त्यांनी विचार करायला हवा.. विधानसभा निवडणुकीत भाजपच्या अतुल भातखळकरांनीमनसेत प्रवेश घेण्याची विनंती करुनही त्यांना मनसेत का घेतलंनाही हे राज ठाकरेंनी जाहीरपणे सांगितलं. आपण भाजपच्या नेत्यांना मनसेत घेत नाही पण मनसेचे नेत्यांना भाजप का घेतंय असा सवालच त्यांनी यातून विचारला होता..त्याला पार्श्वभूमी होती राज यांचे एक शिलेदार घाटकोपरचे राम कदम यांना भाजपमध्ये घेऊन त्यांना उमेदवारी दिली याची....पण राज यांच्या भाजपच्या सॉफ्ट कॉर्नरचा भाजपवर काहीही परिणाम झालेला दिसत नाही...भाजपानं राज ठाकरेंच्या निष्ठावान शिलेदारांना पुन्हा भाजपमध्ये प्रवेश दिलाच..प्रवीण दरेकर,नाशिकचे वसंत गिते आणि कल्याणचे रमेश पाटील या तिन्ही माजी आमदारांना भाजपमध्ये घेण्यात आला..राजकीय निर्णय घेण्याच्या राज यांच्या धरसोड वृत्तीमुळंच पराभव झाल्याची या सर्वांची भावना होती. पराभवानंतरही पक्ष जोमानं कामाला लागलेला दिसत नसल्यामुळं त्यांच्या नैराश्यात अधिकच भर पडली. या नैराश्यातून राजकीय अस्तित्व टिकविण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू होते आणि शेवटी त्यांनी भाजपचा झेंडा खांद्यावर घेतला... निष्ठावानांनी सोडली साथप्रवीण दरेकर हे राज ठाकरे यांचे शिवसेनेपासूनचे निष्ठावान समर्थक..पण त्यांनीही राज ठाकरेंची साथ सोडली.दरेकर हे राज ठाकरेंचे निष्ठावान आणि खंदे समर्थक असले तरी मागच्या काही दिवसांत राज ठाकरेंच्या निकटवर्तीयांचा दरेकर यांच्या मतदारसंघात थेट हस्तक्षेप वाढला होता. प्रचारसभेतच राज ठाकरेंनी दरेकरांची व्होट बँक असलेल्या उत्तर भारतीय आणि झोपडपट्टीच्या विरोधात भूमिका घेतली..त्यानंतर पराभवाचं खापर उमेदवारांवरच फोडल्यानंतर नाराज झालेल्या दरेकांनी दिलेला राजीनामा राज यांनी स्विकारला..तसच राज यांची सुरक्षा राज्य सरकारनं कमी केल्यानंतर दरेकरांनी दिलेली सुरक्षा जीपही राज यांनी परत केली..हे दरेकर यांच्या जिव्हारी लागलं..त्यातच बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई यांचे वाढतं वर्चस्व आणि कृष्णकुंकडून वारंवार अपमानास्पद वागणूक मिळू लागल्यानं दरेकर यांनी अखेर राजनिष्ठेचा झेंडा खाली ठेवला...दरेकरांसारखेच नाशिकमध्ये मनसेचा गड भक्कम करण्यात ज्या वसंत गीतेंनी जीवाचं रान केलं त्यांनाही मागच्या काही महिन्यांपासून डावललं जात होतं. नाशिकमधले पक्षाचे महत्वाचे निर्णय गीते नाहीतर अविनाश अभ्यंकर घेत होते. राज यांनी वसंत गीतेंना डावलून अभ्यंकरावंर जबाबदारी दिली. नाशिकचा महापौर निवडण्यातही वसंत गीते यांना विचारत घेतलं नाही. नाशिक महापालिकेवर मनसेची सत्ता असतानाही कुंभमेळ्याच्या निधी आणि विकासकामात गीतेंना डावलण्यात आलं..वसंत गीते नाराजी असताना नाशिकमध्ये येऊनही राज ठाकरेंनी गीतेंची दखल घेतली नाही. त्यातूनच वसंत गीते यांनी राज ठाकरेंची साथ सोडली. गीते यांनी मनसे सोडल्यानं नाशिकचा मनसेचा गड आता खिळखिळा झालाय..पुन्हा नाशिकमध्ये मनसेचं इंजिन रुळावर येईल हे अशक्यचं दिसतय... मुंबई आणि नाशिकनंतर मनसेला जिथं चांगला जनाधार आहे ते शहर म्हणजे कल्याण..याच कल्याणनं महापालिका आणि २००९ च्या विधानसभा निवडणुकीत भरभरून दिलं. त्याच कल्याणचे आमदार रमेश पाटील यांनीही मनसेला रामराम ठोकत मोदी लाटेत उडी घेतली...रमेश पाटलांचा कल्याणमध्ये पक्षावर फारसा फरक पडेल असं नसलं तरी त्यांचा एक माजी आमदार सोडून का गेला त्याचा विचार करावा लागेलच..दरेकर आणि गिते हे दोघेही जनाधार असलेले नेते असल्यामुळं त्यांच्या जाण्यानं मनसेला नुकसान तर भाजपला फायदाच होणाराय. मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीत दरेकर हे भाजपसाठी जमेची बाजू ठरतीलही.पण मनसेच्या तोटा मात्र नक्कीच होणाराय..असे एक एक निष्ठावान कार्यकर्ते सोडून जात असताना राज ठाकरे यांच्यावर मात्र त्याचा काहीही परिणाम झालेला दिसत नाही..मी म्हणजेच पक्ष अशा थाटात सुरू असलेल्या त्यांच्या कार्यपद्धतीतूनराज यांनी काही धडा घेतला नाही तर मनसेचं फक्त इंजिनच शिल्लक राहिल... कारण बाळासाहेब ठाकरे यांना अनेक कट्टर समर्थक सोडून गेले तर शिवसेनेला काही फरक पडला नाही त्याचं कारण शिवसेनेत बाळासाहेब ठाकरेंचा करिश्मा हाच सर्वात मोठी जमेची बाजू होती...पण बाळासाहेब हे बाळासाहेब होते त्यांचे नेते नाही तर कार्यकर्ते म्हणजे शिवसैनिक खंबीरपणे त्यांच्यापाठीशी उभा होता. ही ताकद राज ठाकरे यांच्यामागे नाही..त्यामुळं एक एक शिलेदार सोडून जाणं ही राज यांच्यासाठी चिंतेची बाब आहे..किल्ल्याचा एक एक बुरूज ढासळू नये म्हणून राज ठाकरे आता काय करतात का त्यावरच मनसेचं भवितव्य अवलंबून आहे..
.... घर फिरलं की घराचे वासेही फिरतात असं म्हंटलं जातं...त्याची प्रचिती मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना सध्या येतेय...लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानं पक्षात निराशेचं वातावरण आहे...म्हणूनच की काय मनसेच्या तीन आघाडीच्या विकेट्स पडल्या....राज ठाकरेंचे निष्ठावान त्यांना का सोडून गेले जातात त्याचा आता त्यांनी विचार करायला हवा.. विधानसभा निवडणुकीत भाजपच्या अतुल भातखळकरांनीमनसेत प्रवेश घेण्याची विनंती करुनही त्यांना मनसेत का घेतलंनाही हे राज ठाकरेंनी जाहीरपणे सांगितलं. आपण भाजपच्या नेत्यांना मनसेत घेत नाही पण मनसेचे नेत्यांना भाजप का घेतंय असा सवालच त्यांनी यातून विचारला होता..त्याला पार्श्वभूमी होती राज यांचे एक शिलेदार घाटकोपरचे राम कदम यांना भाजपमध्ये घेऊन त्यांना उमेदवारी दिली याची....पण राज यांच्या भाजपच्या सॉफ्ट कॉर्नरचा भाजपवर काहीही परिणाम झालेला दिसत नाही...भाजपानं राज ठाकरेंच्या निष्ठावान शिलेदारांना पुन्हा भाजपमध्ये प्रवेश दिलाच..प्रवीण दरेकर,नाशिकचे वसंत गिते आणि कल्याणचे रमेश पाटील या तिन्ही माजी आमदारांना भाजपमध्ये घेण्यात आला..राजकीय निर्णय घेण्याच्या राज यांच्या धरसोड वृत्तीमुळंच पराभव झाल्याची या सर्वांची भावना होती. पराभवानंतरही पक्ष जोमानं कामाला लागलेला दिसत नसल्यामुळं त्यांच्या नैराश्यात अधिकच भर पडली. या नैराश्यातून राजकीय अस्तित्व टिकविण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू होते आणि शेवटी त्यांनी भाजपचा झेंडा खांद्यावर घेतला... निष्ठावानांनी सोडली साथप्रवीण दरेकर हे राज ठाकरे यांचे शिवसेनेपासूनचे निष्ठावान समर्थक..पण त्यांनीही राज ठाकरेंची साथ सोडली.दरेकर हे राज ठाकरेंचे निष्ठावान आणि खंदे समर्थक असले तरी मागच्या काही दिवसांत राज ठाकरेंच्या निकटवर्तीयांचा दरेकर यांच्या मतदारसंघात थेट हस्तक्षेप वाढला होता. प्रचारसभेतच राज ठाकरेंनी दरेकरांची व्होट बँक असलेल्या उत्तर भारतीय आणि झोपडपट्टीच्या विरोधात भूमिका घेतली..त्यानंतर पराभवाचं खापर उमेदवारांवरच फोडल्यानंतर नाराज झालेल्या दरेकांनी दिलेला राजीनामा राज यांनी स्विकारला..तसच राज यांची सुरक्षा राज्य सरकारनं कमी केल्यानंतर दरेकरांनी दिलेली सुरक्षा जीपही राज यांनी परत केली..हे दरेकर यांच्या जिव्हारी लागलं..त्यातच बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई यांचे वाढतं वर्चस्व आणि कृष्णकुंकडून वारंवार अपमानास्पद वागणूक मिळू लागल्यानं दरेकर यांनी अखेर राजनिष्ठेचा झेंडा खाली ठेवला...दरेकरांसारखेच नाशिकमध्ये मनसेचा गड भक्कम करण्यात ज्या वसंत गीतेंनी जीवाचं रान केलं त्यांनाही मागच्या काही महिन्यांपासून डावललं जात होतं. नाशिकमधले पक्षाचे महत्वाचे निर्णय गीते नाहीतर अविनाश अभ्यंकर घेत होते. राज यांनी वसंत गीतेंना डावलून अभ्यंकरावंर जबाबदारी दिली. नाशिकचा महापौर निवडण्यातही वसंत गीते यांना विचारत घेतलं नाही. नाशिक महापालिकेवर मनसेची सत्ता असतानाही कुंभमेळ्याच्या निधी आणि विकासकामात गीतेंना डावलण्यात आलं..वसंत गीते नाराजी असताना नाशिकमध्ये येऊनही राज ठाकरेंनी गीतेंची दखल घेतली नाही. त्यातूनच वसंत गीते यांनी राज ठाकरेंची साथ सोडली. गीते यांनी मनसे सोडल्यानं नाशिकचा मनसेचा गड आता खिळखिळा झालाय..पुन्हा नाशिकमध्ये मनसेचं इंजिन रुळावर येईल हे अशक्यचं दिसतय... मुंबई आणि नाशिकनंतर मनसेला जिथं चांगला जनाधार आहे ते शहर म्हणजे कल्याण..याच कल्याणनं महापालिका आणि २००९ च्या विधानसभा निवडणुकीत भरभरून दिलं. त्याच कल्याणचे आमदार रमेश पाटील यांनीही मनसेला रामराम ठोकत मोदी लाटेत उडी घेतली...रमेश पाटलांचा कल्याणमध्ये पक्षावर फारसा फरक पडेल असं नसलं तरी त्यांचा एक माजी आमदार सोडून का गेला त्याचा विचार करावा लागेलच..दरेकर आणि गिते हे दोघेही जनाधार असलेले नेते असल्यामुळं त्यांच्या जाण्यानं मनसेला नुकसान तर भाजपला फायदाच होणाराय. मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीत दरेकर हे भाजपसाठी जमेची बाजू ठरतीलही.पण मनसेच्या तोटा मात्र नक्कीच होणाराय..असे एक एक निष्ठावान कार्यकर्ते सोडून जात असताना राज ठाकरे यांच्यावर मात्र त्याचा काहीही परिणाम झालेला दिसत नाही..मी म्हणजेच पक्ष अशा थाटात सुरू असलेल्या त्यांच्या कार्यपद्धतीतूनराज यांनी काही धडा घेतला नाही तर मनसेचं फक्त इंजिनच शिल्लक राहिल... कारण बाळासाहेब ठाकरे यांना अनेक कट्टर समर्थक सोडून गेले तर शिवसेनेला काही फरक पडला नाही त्याचं कारण शिवसेनेत बाळासाहेब ठाकरेंचा करिश्मा हाच सर्वात मोठी जमेची बाजू होती...पण बाळासाहेब हे बाळासाहेब होते त्यांचे नेते नाही तर कार्यकर्ते म्हणजे शिवसैनिक खंबीरपणे त्यांच्यापाठीशी उभा होता. ही ताकद राज ठाकरे यांच्यामागे नाही..त्यामुळं एक एक शिलेदार सोडून जाणं ही राज यांच्यासाठी चिंतेची बाब आहे..किल्ल्याचा एक एक बुरूज ढासळू नये म्हणून राज ठाकरे आता काय करतात का त्यावरच मनसेचं भवितव्य अवलंबून आहे..
Saturday, August 30, 2014
आरक्षणाचा (राजकीय) खेळखंडोबा
“निवडणुका म्हटलं की
महाराष्ट्रात थोर नेत्यांच्या स्मारकांचा वाद हमखास उकरून काढला जातो..पण
यावेळच्या निवडणुकीत मुद्दा आहे तो आरक्षणाचा....मराठा, मुस्लिम
समाजाच्या आरक्षणाचा वाद सरकारनं निकाली काढलाय...तर आता धनगर समाजाचा समावेश
एसटीमध्ये करण्याचा मुद्दा ऐरणीवर आहे...त्याला आदीवासी नेत्यांचा विरोध
आहे...निवडणुकीच्या तोंडावरच हा वाद ऐरणीवर आलाय...धनगर समाजानं ही मागणी कशाच्या
आधारावर केलीय. .?आदीवासींचा त्याला विरोध का
आहे..? त्यावर बेतलेला हा लेख...”
महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीचं वारं
वाहू लागलय...लोकसभा निवडणुकीत मतदारांनी दिलेल्या दणक्याचा धक्का दोन्ही पक्षानं
घेतलाय..वर्षानुवर्षे सत्तेत राहण्याची सवय लागलेल्या काँग्रेस आणि
राष्ट्रवादींच्या नेत्यांची या पराभवानं झोप उडालीय.. लोकांसमोर कोणता मुद्दा घेऊन
जायचा याची चिंताही त्यांना सतावतेय.. पंधरा वर्षात आघाडी सरकारनं काय ‘दिवे’
लावलेत याची प्रचिती या नेत्यांना आणि मंत्र्यांना येऊ लागलीय..विकासाच्या
मुद्द्यावर निवडणुका जिंकता येतात हे मोदींनी दाखवून दिलं असलं तरी आघाडी सरकारला
मात्र या मुद्द्यावर मतं मागणंही महागात पडणाराय... त्यामुळचं दुसरे मुद्ददे पुढं
केले जात आहेत...त्यातलाच हा आरक्षणाचा मुद्दा आहे...
2009 च्या विधानसभा निवडणुकीत बाबासाहेब
आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महारांजांच्या स्मारकाचा मुद्दा चांगलाच चर्चेत
होता..दोन्ही समाजाच्या नेत्यांनी त्यासाठी मोठी आंदोलनं केली..गल्लीपासून
दिल्लीपर्यंत स्मारकासाठी लढा देण्यात आला...आता या स्मारकांच्या मुदद्याचा विसर
नेत्यांनाच पडलाय..स्मारकाचा प्रश्न आता विसरल्यामुळं लोकांना कोणत्या मुद्द्यावर
झुंजवायचं तर तो म्हणजे आरक्षण.. याच मुद्द्यावरून मागच्या दोन वर्षात
महाराष्ट्रातलं वातावरण पेटत ठेवण्यात आलं...
धनगर समाजाचा अनुसुचित जातीत समावेश करावा
यासाठी मोठं आंदोलन करण्यात आलं..पवारांच्या बालेकिल्ल्यातूनही त्यासाठी आवाज
बुलंद करण्यात आला...पण पवारांच्या राष्ट्रवादीतून त्याला विरोध करण्यात
आला...मधूकर पिचड यांनी आदीवासी नेत्यांचं शिष्टमंडळ घेऊन राष्ट्रपतींकडेच गा-हाणं
मांडलं. पण राज्य कॅबिनेटनं धनगर समाजाला तिस-या सूचित टाकण्याचा प्रस्ताव
मांडलाय..धनगर समजानं मात्र हा प्रस्ताव फेटाळला..त्यानंतर शरद पवार मैदानात उतरले
आणि धनगर समाजाला दुस-या सूचित टाकण्याचा सल्ला त्यांनी दिलाय..धनगर समाजाचं
असलेलं प्राबल्य आणि नुकताच झालेला पराभव लक्षात घेऊन पवारांनी धनगर समाजाची मागणी
उचलून धरलीय.. बारामती मतदारसंघातून धनगर समाजाचे नेते महादेव जानकर यांनी सुप्रिया
सुळे यांची दमछाक केली होती...या मतदरासंघातून जानकरांनी साडेतीन लाख मतं घेतली
होती. त्याकडे दुर्लक्ष करून पवारांना चालणार नाही...त्यातच पवारसाहेब
विधानसभेसाठी कोणताच धोका पत्करायला तयार नाहीत असं दिसतय...
धनगर समाजाची मागणी?
महाराष्ट्रात धनगरांची लोकसंख्या जवळपास दीड
कोटींच्या घरात असून त्यांना सध्या एनटी-सी म्हणजेच भटक्या विमुक्त जाती
प्रवर्गांतून 3.5 टक्के आरक्षण मिळतंय. पण त्यांना आता आदिवासींच्या कोट्यातून
आरक्षण हवंय. आपली मागणी पटवून देण्यासाठी धनगर नेते अनुसूचित जमातीच्या सूचीचा
दाखला देतातयत..
काय आहे या सूचित ?
1960 मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या या
सूचीमध्ये ‘ओरान’ आणि उपजात ‘धनगड’ यांचा समावेश करण्यात आलाय..या सूचीमधला ‘धनगड’
शब्द म्हणजे धनगर असून, 'र' च्या जागी चुकून 'ड' वापरण्यात
आल्याचा युक्तीवाद हे नेते करत आहेत..या धर्तीवर धनगरांना अनुसुचीत जमातींमध्ये
सामावून आदिवासींना देण्यात
येणा-या सवलती धनगरांनाही देण्यात याव्यात अशी मागणी केली जातेय...
आदिवासींचा विरोध का आहे ?
धनगरांचा हा युक्तीवाद आदिवासींनी व्यवस्थित
खोडून काढलाय...’DHANGAD’ या इंग्रजी शब्दाचा उच्चार
‘धनगड’ असा नसून ‘धांगड’ आहे असा प्रतिवाद आदिवासी नेते
करताहेत...अनुसूचित जमातीच्या यादीत ३६ क्रमांकावर असलेली ‘धांगड’
ही ओरानची उपजात असून शेती हा त्यांचा व्यवसाय आहे..तर धनगरांचा पारंपरिक व्यवसाय हा
मेंढीपालनाचा आहे असं आदिवासींचं म्हणणंय..तसंच महाराष्ट्र शासन विरूद्ध मिलिंद
कटवारे या केसमध्ये सुप्रीम कोर्टानं या संदर्भात महत्वाचा निकाल
दिलाय...राष्ट्रपतींनी जाहिर केलेल्या अनुसूचित जमातींच्या यादीत शासन, न्यायालय किंवा कोणताही अधिकारी बदल करू शकत
नाही...हा अधिकार फक्त आणि फक्त संसदेलाच आहे असं सुप्रीम कोर्टानं बजावून
सांगितलंय...त्यामुळे आदिवासींचा दर्जा देण्याची धनगरांची मागणी कायद्याला धरून
नसल्याचं आदिवासी नेत्यांचं म्हणणंय..
आदिवासी कोणाला म्हणावं ?
एखाद्या समाजानं आदिवासी असल्याचा दावा केला
तर त्यासाठीही काही महत्वाचे निकष आहेत. यातला सर्वात महत्वाचा म्हणजे त्या
समाजाची आदिम वैशिष्ट्ये असली पाहिजेत. तसंच त्या समाजाची आपली स्वतःची एक
वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती असली पाहिजे. तसंच वास्तव्याची प्रदेश निश्चिती आणि दुर्गमतेचे
निकषही त्या समाजाला सिद्ध करावे लागतात...तेव्हा कुठे सरकार त्या समाजाला आदिवासी
म्हणून घोषित करतं आणि हे करताना त्यांचा निवासी प्रदेशही निश्चित करून त्या
भागातच त्यांना आदिवासींचं आरक्षण मिळतं...धनगर समाज या निकषात बसतो का हा खरा
प्रश्न आहे..या निकषात आपण बसत असल्याचा धनगरांचा दावा आहे. दोन्ही बाजूंनी दावे
प्रतिदावे केले जात आहेत...यात सरकारनं कोणताही निर्णय घेतला तरी कायद्याच्या
कसोटीवर टीकणं महत्वाचं आहे..यातून काय मार्ग निघतो तो लवकरच स्पष्ट होईलं...Friday, July 25, 2014
नारायण राणेंचं बंड- हार की प्रहार ?
"नारायण राणेंची जडणघडणच बाळासाहेब ठाकरेंच्या तालमीत झालेली...त्यामुळं आक्रमकपण त्यांच्या अंगात ठायीठायी भरलेला आहे..ते शिवसेनेत असो वा काँग्रेसमध्ये एक घाव दोन तुकडे असा त्यांचा स्वभाव. ‘एकच अंगार बाकी सगळे भंगार’ म्हणजे राणे...पण आता राणेंमध्ये तो जोश राहलेला नाही का?...का कमी झाला राणेंचा आक्रमकपणा,? त्यांच्या बंडात आव्हानाऐवजी तडजोडीचाच प्रयत्न दिसतोय का?..राणेंच्या बंडाचा अर्थ लावणारा हा लेख....”
शिवसेनेतून काँग्रेसमध्ये येऊन नारायण
राणेंना 9 वर्ष झाली. या 9 वर्षांत राणेंना महत्वाची पदं मिळाली..काही समर्थकांना
विधान परिषद,
विधानसभेची उमेदवारीही मिळाली..पण मुख्यमंत्रीपदाची त्यांची इच्छा
काही काँग्रेस हायकमांड पूर्ण करू शकलं नाही हि सल त्यांचा मनात आहे..पण आता
विधानसभेला जेमतेम दोन महिने राहिले असताना औट घटकेचा मुख्यमंत्री काँग्रेस करणार
नाही आणि राणेंनाही ते नको आहे मग राणेंचा हा थयथयाट कशासाठी आहे...
लोकसभेच्या निवडणुकीत राणेंच्या मुलाचा
शिवसेनेच्या विनायक राऊत यांनी मोठ्या फरकानं पराभव केला. हा पराभव राणे यांच्या
खूपच जिव्हारी लागलाय..कोकणातलं त्यांचं साम्राज्याही आता राहीलेलं नाही..दीपक
केसरकर या राष्ट्रवादीच्या आमदारानं तर राणेंना थेट आव्हान देत दोन हात करण्याची
भाषा केलीय.. याच केसरकरांनी लोकसभा निवडणुकीत राणेंच्या विरोधात काम
केलं..राणेंचा मुलगा नितेश राणेही आक्रमक पण त्यांच्या गाडीवर सिंधुदुर्गात दगडफेक
झाली. राणेंची फोस्टर्स फाडली यावरून राणेंचा कोकणातला दबदबा संपल्याचं दिसतय..
एकीकडं कोकणतल्या साम्राज्याला लागलेला
सुरुंग आणि दुसरीकडे काँग्रेसची सत्ता पुन्हा येणार नाही याची राणेंना खात्री
आहे..आघाडीची सत्ता जाऊन शिवसेना भाजपची सत्ता आली तर उद्धव ठाकरे आपल्याविरोधात
कारवाईचा ससेमिरा लावतील अशी भितीही त्यांनी सतावतेय..काँग्रेससोडून जावं तर
पर्यायही कमी आहेत..शिवसेनेत त्यांना दस्तुरखुद्द उद्धव ठाकरेंचाच तीव्र विरोध
आहे...राष्ट्रवादीत जाणं शक्य नाही..मनसेत जावं तर मनसेचीच अवस्था बिकट आहे..आणि
भाजपमध्ये जायचं तर उद्धव ठाकरे यांनी त्याला कडाडून विरोध केलाय..त्यामुळं
राणेंची मोठी पंचायत झालीय..सर्व बाजूंनी कोंडी झालेल्या राणेंनी राजीनाम्याचं
हत्यार उपसून दबावाचं राजकारण करण्याचा प्रयत्न केलाय..यासाठी राणे 10 जनपथकडे
डोळे लावून बसलेत...यातून त्यांच्या पदरात काही पडतंय का हे पाहणं महत्वाचं आहे...
Thursday, July 17, 2014
पृथ्वीराज चव्हाण सर्वांना पडले 'लय भारी'
पृथ्वीराज चव्हाण यांनी पक्षांतर्गत विरोधकांना तर गप्प बसवलच पण राष्ट्रवादी काँग्रेसला ताळावर आणलं...अशोक चव्हाण यांना आदर्श प्रकरणातून हटवल्यानंतर त्यांच्या जागी दिल्लीतून आलेल्या या पृथ्वीराज चव्हाण यांना सुरूवातीला राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमधल्या मुख्यमंत्री विरोधकांनी फारसं गांभिर्यानं घेतलं नाही..अजित पवार यांना तर आता काँग्रेसवर कुरघोडी करणं सहज सोपं जाईल असचं वाटलं होतं. पण सर्वांची गणितं चुकली आणि या बाबांनी सर्वांची जिरवली...तीन वर्ष पृथ्वीराज चव्हाण यांच्याविरोधात काँग्रेसमधून कोणी ब्र शब्दही काढला नाही यावरून त्यांची दिल्लीतली पत किती मोठी आहे याचा अंदाज येतो....
पृथ्वीराज चव्हाण हे दरबारी राजकारणी...ते
कराडमधले असले तरी त्यांचं राजकारण बहरलं ते दिल्लीतच..गांधी कुटुंबाशी त्यांची
असलेली जवळीक सर्वांना माहित आहे..पृथ्वीराज चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
होतील असं कोणालाही वाटलं नव्हतं पण काँग्रेसच्या नेहमीच्या राजकारणाप्रमाणे केवळ गांधी घराण्याचे एकनिष्ठ म्हणून
मुख्यमंत्रीपदाची खुर्ची बहाल करण्यात आली..ते मास लिडर प्रकारात मोडत नाहीत, त्यांचा राज्यात कोणता गटही नाही...पण हायकमांडनं त्यांना महाराष्ट्रात पाठवलं
आणि राज्यातल्या राजकारणाला वेगळचं वळण लागलं..
पृथ्वीराज चव्हाण यांच्याबरोबर उपमुख्यमंत्री
म्हणून राष्ट्रवादीकडून अजित पवार यांची वर्णी लागली. त्यावेळी सर्वांनीच अजितदादा
हे बाबांना खावून टाकणार असचं बोललं जात होतं. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, अजित
पवारही त्याच आविर्भावात होते...पण बाबांनी पहिला दणका दिला तो राष्ट्रवादीचं
वर्चस्व असलेल्या शिखर बँकेला..त्यांनी बँकेचं संचालक मंडळच बरखास्त केलं...त्यानंतर अजितदादांच्या मर्जितल्या
जलसंपदा विभागाचा भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणायला लावला...त्यातून अजित पवारांचा
तिळपापड झाला..बाबांनी एक एक करून
राष्ट्रवादीला जेरीस आणलं. बाबांनी अजितदादा आणि राष्ट्रवादीची अशी
कोंडी केली की त्यातून अजित पवारांना राजीनामा द्यावा लागला..पण बाबांनी माघार
घेतली नाही,
गप्प बसून त्यांनी राष्ट्रवादीला जागा दाखवून दिली...शरद पवार
यांनाही मग मुख्यमंत्री कसे काम करत नाहीत अशी जाहीर टीका करावी लागली...मुख्यमंत्री फाईलींवर सहीच करत
नाही यावरून किती वाद झाला...मुख्यमंत्र्यांच्या हाताला लखवा मारतो काय एवढ्या
पर्यंत शरद पवारांनीही मुख्यमंत्र्यांवर टीका केली पण बाबा बधले नाहीत..त्यांनी
राष्ट्रवादीला पुरतं जेरीस आणलं...राष्ट्रवादी काँग्रेसला जसं बाबांनी जागा दाखवली तशीच त्यांनी पक्षातल्या विरोधकांनाही जागा दाखवून दिली..एक तर उठसूठ मुख्यमंत्र्यांविरोधात दिल्लीत जाऊन तक्रारी करण्याचा प्रकार पृथ्वीराज चव्हाण आल्यानंतर बंद झाला..दिल्लीत राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्यासमोर जाण्याची कोणाची हिम्मतही झाली नाही..मुख्यमंत्री आपल्याच पक्षातल्या आमदारांची कामं करत नाहीत अशा तक्रारी येत होत्या पण करणार काय...नारायण राणे, पतंगराव कदम, माणिकराव ठाकरेंसह अनेकांना मुख्यमंत्र्यांनी वावच दिला नाही...या सर्वांना लोकसभा निवडणुकीतल्या काँग्रेसच्या पराभवानंतर मात्र बळ आलं..काँग्रेसच्या पराभवाला मुख्यमंत्र्यांची काम करण्याची पद्धतच कारणीभूत असल्याचा आरोप करत विधानसभा जिंकायची असेल तर मुख्यंमत्री बदला म्हणून काँग्रेससह राष्ट्रवादीनंही तगादा लावला..काँग्रेसच्या नेत्यांनी दिल्लीत जाऊन मुख्यमंत्री बदलाचं वातावरणही तयार केलं पण झालं काही नाही.. मुख्यमंत्र्यांनी सर्वांची कुंडलीच हायकमांडसमोर मांडली...मुख्यमंत्री बदला म्हणून आघाडीवर असलेल्या नारायण राणे हे तर मुलाच्या विजयासाठी मतदारसंघ सोडून प्रचाराला बाहेरही पडले नाहीत..आणि बाकीचे नेते स्वतःच्या मतदारसंघातही काँग्रेसला आघाडी देऊ शकले नाहीत ते राज्याचं नेतृत्व काय करणार असा प्रश्नही उपस्थित केला...त्यामुळं सर्वांची बोलती बंद झाली...
पृथ्वीराज चव्हाण यांना कोणताही गट सांभाळायचा नाही..फक्त हायकमांडचा आशिर्वाद पाहिजे आणि तो त्यांच्यावर आहेच...त्यामुळं राष्ट्रवादीसह काँग्रेसमधल्या विरोधकांना ते भारी पडले....आता विधानसभा निवडणुकीत पराभव झाला तरीही त्यांच्याकडे गमावण्यासारखं काहीच नाही....शेवटी एवढचं की राजकारणात स्वतःला फार मोठा नेता म्हणून मिरवणा-यांना बाबांनी चांगलच वठणीवर आणलय..स्वच्छ प्रतिमा तर त्यांनी जपलीच पण कोणतीही आगपाखड न करता शांतपणे त्यांनी सर्वांना गप्प केलं....
Sunday, July 6, 2014
मुंबईत फक्त 5 रुपयांत पोटभर जेवण !!!!
सत्तेचा माज कसा चढतो याचं उत्तम उदाहरण
म्हणजे भारतीय जनता पार्टीचे नेते आणि त्यांच्या नेत्यांची सध्याची बेताल
वक्तव्य...मुंबई शहरात पाच रुपयांत पोटभर जेवायला मिळतं असं भाजपचे मुंबई प्रदेश अध्यक्ष आशिष शेलार
यांनी म्टयलय..हे
शेलारसाहेब मुंबईचेच...यांचं आयुष्य या शहरातच गेलं...सध्या ते मुंबईचे भाजप
अध्यक्ष आणि आमदार आहेत...मुंबईमध्ये सामान्य माणसाचं खाणं म्हणजे वडापाव. ..हा
वडापावही 5 रुपयांना मिळत नाही याची शेलारांना माहिती नाही.. कारण हा वडापाव 10
रुपयांच्या खाली कुठंही मिळत नाही..मग मुंबईत पाच रुपयात पोटभर जेवण मिळतं कुठं हे
त्यांनी सांगायला हवं...या शेलारांनी मागच्या काही वर्षांत पाच रुपये तरी बघितलेत
आहेत का. कालपर्यंत विरोधीपक्षात असताना उठसुठ काँग्रेसवर तोफ डागणा-या भाजपची
दिल्लीत पूर्ण बहुमतानं सत्ता आल्यापासून त्यांची भाषा बदललीय...एका महिन्यात
सत्तेचा माज या भाजपवाल्यांना आल्याचं त्यांच्या चालण्याबोलण्यातून दिसतोय..
मागच्या पाच सहा महिन्यापूर्वीच काँग्रेसच्या
काही महाशयांनी अशीच गरिबांची थट्टा उडवली होती...त्यात याच महानगरात वावरलेलं
बॉलिवूड अभिनेता आणि काँग्रेसचे खासदार राज बब्बर यांनी मुंबईत 12 रुपयात पोटभर
जेवण मिळतं असा मुर्ख दावा केला होता...त्यावेळी हेच भाजप नेते राज बब्बर
यांच्यावर तुटून पडले होते.. आता दिवस बदललेत, सत्तेत भाजप आहे आणि विरोधात
काँग्रेस पण गरिबांची थट्टा करायचं काही थांबलेलं नाही...50 रुपये कमावणारा गरिब
नाही असा दावाही करणारे सरकारच...आणि पाच 10 रुपयात पोटभर जेवण मिळतं सांगणारेही
आमच्याच देशातले नेते...या नेत्यांनी कधी आपल्या आलिशान गाडीतून खाली उतरून
स्वतःच्या पैशानं कमी पैशांत जेवण केलय का....हा प्रकार जसा सत्तेचा माज दाखवतो
तसच या नेत्यांना वस्तूस्थितीचं किती अज्ञान आहे हेही यातून दिसतंय..
आशिष शेलार काय राज बब्बर काय..पक्ष कोणताही
असो गरिबी आणि गरिबांचा कळवळा यांना किती आहे हे सांगण्याचा त्यांचा फक्त प्रयत्न
असतो...ज्या भाजपच्या आशिष शेलार यांनी पाच रुपयात पोटभर जेवण मिळतं असं
म्हटलय..त्यांच्याच पक्षाचे पंतप्रधान झालेले नरेंद्र मोदी गरिब चहावाला देशाचा
पंतप्रधान झाला म्हणून केवढी स्तुती झाली...पण त्यांना गरिबांचा किती कळवळा आहे हे
सत्तेत आल्यानंतर एका महिन्यातच वाढलेल्या महागाईच्या आलेखानं दिसलय...महागाई का
वाढली याचं लंगडं समर्थन आता हे भाजपचे नेते करत आहेत...सत्ता मिळवण्यासाठी फक्त
थापा मारण्याचा धंदा या नेत्यांनी सुरू केलाय..
पंधरा वर्ष सत्तेत असलेल्या राष्ट्रवादीच्या
नेत्यांना सत्तेचा माज आलाय म्हणून भाजपचे हेच नेते टीका करण्यात आघाडीवर
होते..आशिष शेलार,
विनोद तावडे यांनी मागच्या काही वर्षात अजित पवार, आर आर पाटील यांच्यावर कशी टीका केलीय ते आठवून पाहा...राष्ट्रवादीच्या
नेत्यांना सत्तेचा माज आलाय म्हणणा-या भाजपची केंद्रात सत्ता येऊन अवघा महिना
झालाय, अजून महाराष्ट्रात सत्ता आलेली नाही तर यांचं विमान
हवेत उडायला लागलय..पंधरा वर्ष सत्तेत राहिल्यावर तर माज येणारच पण यांना तर एका
महिन्यात माज आलाय हे शेलारांच्या बोलण्यातून दिसतय...
शेलारसाहेब, तुम्ही मुंबई प्रदेशचे
अध्यक्ष आहात ..सार्वजनिक जीवनात बोलताना काही तारतम्य बाळागयचं असतं हे तुम्हाला
माहिती नाही असं कसं म्हणता येईलं...बोलताना कधी कधी नेत्यांचा तोल सुटतो..पण एवढा
तोल सोडू नका की त्यातून
गरिबांची
आणि गरिबीची थट्टा करावी...हे तुम्हाला
शोभत नाही एवढचं ...
Saturday, May 31, 2014
राज ठाकरेंचा करिश्मा संपलाय का ?
लोकसभा निवडणुकीत शिवसेनेची वाट लावायला निघालेल्या राज ठाकरेंना लोकांनी मोठा दणका देत त्यांचीच औकात दाखवून दिलीय....नरेंद्र मोदींच्या नावाचाही त्यांनी वापर केला पण त्याचाही काही परिणाम झाला नाही...गेल्या निवडणुकीत लाखालाखांची मतं घेऊन मुंबईतले महायुतीचे सर्व उमेदवार मनसेनं पाडले होते. पण यावेळी कल्याणच्या राजू पाटलांचा अपवाद वगळता मनसेच्या एकाही उमेदवाराला लाखाच्यावर मतं मिळालेली नाहीत. पण ते 1 लाख 22 हजार मतं घेऊनही तिस-याच क्रमांकावर राहिले. तर मनसेचा बालेकिल्ला असलेल्या नाशिकमधून डॉ. प्रदीप पवारांचं डिपॉझिटही जप्त झालं. गंमत म्हणजे मोदी लाटेचा फायदा घेण्यासाठी राज ठाकरेंनी निवडणूकीपूर्वीच पाठिंबाही देऊन टाकला होता...पण लोकांनी थेट महायुतीच्या उमेदवारांना मतं देणं पसंत केलं...लोकसभेच्या निवडणुकीत भाजपच्या २३ तर शिवसेनेच्या तब्बल 18 जागा निवडून आल्या....त्यामुळे शिवसेनेची वाट लावण्याच्या नादात राज ठाकरे स्वतःच तोंडावर पडले...
मनसेनं दहाच उमेदवार उभे केले पण त्यांना यावेळी लोकांना साफ नाकारलं..मतांचा विचार केला तर या निवडणुकीत मनसेला अवघी दीड टक्का मतं मिळालीत....राज ठाकरेंनी निवडणुकीपूर्वी आपवर टीका करताना महाराष्ट्रात मनसेच बाप असल्याची वल्गना केली होती...पण मतदानाच्या टक्केवारीतही आपनच मनसेला मागे टाकलंय...केजरीवालांच्या आपला महाराष्ट्रात 2.3 टक्के मतं मिळालीत. मनसेला सत्ता द्या, महाराष्ट्राताला सुतासारखा सरळ करून दाखवतो असं म्हणणा-या राज ठाकरेंनाच मतदाराजांनी त्यांची जागा दाखवून दिलीय.
राज ठाकरेंनी महाराष्ट्रातल्या जनतेला त्यातही तरुणवर्गाला एक मोठं स्वप्न दाखवलं होतं..राज्यात एक नवा पर्याय त्यांनी उभा केला होता..राज ठाकरेंवर विश्वास दाखवत लोकांनी त्यांना डोक्यावर घेतलं.. मीडियानंही राज ठाकरेंना भरपूर फुटेज दिलं..लाखा-लाखांच्या सभा झाल्या...यातूनच नाशिक महापालिकेत मनसेची सत्ता आली...कल्याण डोंबिवलीत मनसेनं मोठी मुसंडी मारली...तर पुण्यातही २९ नगरसेवक निवडून दिले....पण त्यानंतर मनसेचा आलेख खाली आला..राज ठाकरे फक्त भाषणबाजीच करतात.. प्रत्यक्षात काहीही करत नाहीत असा लोकांना प्रत्यय आला..त्यातच मोदींची लाट आली आणि या लाटेत मनसेही साफ धुवून गेली..आता विधानसभा निवडणुकीत लोकांनी जर राज ठाकरेंना नाकारलं तर मात्र त्यांची राजकीय कारकिर्द धोक्यात जाईल...
Subscribe to:
Posts (Atom)



