Saturday, February 21, 2015

कुठं आहे पुरोगामी महाराष्ट्र?

“महाराष्ट्र हे पुरोगामी विचारांचं राज्य. महाराष्ट्राएवढा पुरोगामी विचार देशात कोणत्याही राज्यात रुजला नाही पण याच राज्यात प्रतिगामी शक्तीही तेवढ्याच वाढल्यात नव्हे फोफावल्यात...दाभोळकरांची हत्या असो वा पानसरेंची...यातून या प्रतिगामी शक्ती डोकं वर काढत असल्याचंच दिसतय..ज्या राज्यात पुरोगामी विचाराचा मोठा लढा उभारला त्याच राज्यात प्रतिगामी शक्ती का वाढाव्यात.”


अब्राहम लिंकन, महात्मा गांधी, नरेंद्र दाभोळकर काय आणि गोविंद पानसरे काय या सर्व महान व्यक्तींमध्ये एक साम्य आहे.....हे साम्य म्हणजे हे सारे जण परिवर्तनाचा विचार मांडला म्हणून शहीद झालेत..अमेरिकेत अब्राहम लिंकन यांनी दिलेला वर्णव्देष आणि गुलामगिरीविरोधातला लढा असो वा गोविंद पानसरेंनी दिलेला कामगार,शोषितांसाठीचा लढा असो... या सर्वांनी एका प्रतिगामी विचारांना विरोध केला...प्रागतिक विचार मांडले...पण हे विचार काहींना पटले नाहीत. या विचारांना विरोध करणा-यांनी त्यांची हत्या केली..पण या सर्वांची हत्या करून हे लोक त्यांचे विचार संपवू शकले नाहीत...माणूस मारल्यानं विचार मरत नाहीत हे चिरंतन सत्य आहे...शेकडो वर्षांपूर्वी ज्ञानोबाराय,तुकोबांनीही भंपक आणि भोंदूपणाविरुद्ध विचार मांडले...पण व्यवस्थेच्या तथाकथित रक्षणवाद्यांनी त्यांनाच टार्गेट केलं.....त्यांना संपवलं....पुरोगामी विचाराला होणा-या गैरसमजातून या सर्वांना संपवण्यात आलं...  महाराष्ट्राएवढा पुरोगामी आणि परिवर्तनवादी विचार इतर कोणत्याच राज्यात अजूनही नाही. महात्मा ज्योतीबा फुले, धोंडो केशव कर्वे, आगरकर,बाबासाहेब आंबेडकर, प्रबोधनकार ठाकरे,कोल्हापूरचे शाहू महाराज यांनी महाराष्ट्रात हा विचार रुजवला...पण त्यांनाही त्यावेळी विरोध झालाच.....आगरकर आणि प्रबोधनकार ठाकरेंची तर जीवंतपणीच अंत्ययात्रा काढण्यात आली होती...आणि ज्योतीबा फुल्यांनाही मारण्याचा प्रयत्न झाला होताच.....महाराष्ट्रात जेवढे पुरोगामी विचारांचे लोक आहेत तेवढेच किंवा त्याहूनही जास्त या विचाराचे मारेकरेही आहेत. महात्मा गांधींची हत्या करणारेही याच महाराष्ट्रातले......याच प्रतिगामी विचारांनी महात्मा गांधी, नरेंद्र दाभोळकर आणि पानसरेंना संपवलं हे या महाराष्ट्राचं दुर्दैवच म्हणावं लागेल.डॉ. नरेंद्र दाभोळकर आणि पानसरेंच्या हत्येनंतर महाराष्ट्रात पुरोगामी विचार अजून रुजलेले नाहीत का असा प्रश्न पडतो....का महाराष्ट्राचा वैचारिक समतोल ढासळतोय....हिंसा ही वाईटच....त्याची निंदा करावी तेवढी कमीच....मग ती डाव्या विचारांविरोधातली असो वा उजव्या.... महाराष्ट्रत आणि देशातही प्रतिगामी शक्तींची वाढ होत आहे हेच यातून दिसून येतय....प्रतिगामी शक्तींचा सुळसुळाट झालाय...हत्या कोणाचीही होवो, हल्ला कोणावरही होवो, अशा हल्लेखोरांचा शोध लावलाच पाहिजे... परिवर्तनाचा विचार रुजला पाहिजे...परिवर्तन नसेल तर मनुष्यजन्म व्यर्थ आहे...

No comments:

Post a Comment