Friday, July 27, 2012

शरद पवारांच्या नाराजीचे कारण..राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या आठवड्यात राजकारण तापवलं..पहिल्यांदा त्यांनी कॅबिनेटला दांडी मारुन आपली नाराजी व्यक्त केली..कारण काय तर म्हणे प्रणव मुखर्जी यांच्या नंतर मंत्रिमंडळात ज्येष्ठ आपणनच असताना ए. के अँटोनी यांना दोन नंबरची जागा कशी काय दिली..त्यानंतर चार दिवसांनी पुन्हा पवारसाहेब युपीएच्या बैठकीला गेले नाहीत..त्यांचे सहकारी प्रफुल्ल पटेलही गेले नाहीत..त्यावेळी हे सर्वजन पवारांच्या दिल्लीतल्या घरीच होते आणि माध्यमातून त्यांनी युपीए  सरकारवर आपली नाराजी व्यक्त केली..त्याच दिवशी पटेलांनी पत्रकारांना सांगितले की पवारसाहेब नंबरगेमवरुन नाराज नाहीत तर युपीए सरकार असताना काँग्रेस मात्र घटक पक्षांना विचारात न घेताच सर्व निर्णय घेतं, ते आपल्याला मान्य नाही..वेळ पडली तर आम्ही सरकारमधून बाहेर पडू..पण आमचा पाठिंबा सरकारला राहिलच...हे सांगताना पटेलसाहेबांनी महाराष्ट्रातील आघाडीचा उल्लेखही आवर्जून केला..आणि दिल्लीतला नाराजीचा सूर मग मुंबईत निघाला..राष्ट्रपती पदाची मतमोजणी सुरु असताना पवारांनी काँग्रेसवर हा दबावाचा डाव टाकला..त्यानंतर  राष्ट्रवादीची मुंबईत बैठक घेऊन राज्यातलंही सरकार काही व्यवस्थित चालत नाही असा सूर पवारांच्या साक्षीनंच लावला गेला...वेळ पडली तर राज्य मंत्रिमंडळातूनही बाहेर पडू अशी इशारा वजा धमकी देऊन टाकली...पवारांनी एकाच वेळी दिल्ली आणि मुंबईतून इशारा देऊन काँग्रेसला बुधवारची डेडलाईनही दिली...
गाठ माझ्याशी आहे

पवारांच्या या नव्या गुगलीमुळे काँग्रेस आणि पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी पवारांचं महत्व मोठं आहे हे सांगितलं..त्यावेळी पवार सोनिया गांधी आणि पंतप्रधान ह्यांना भेटलेही..पण नाराजी काय दूर झाली नाही.. हे सर्व झाल्यानंतर शेवटी बुधवारी पंतप्रधान आणि सोनिया गांधी यांच्याबरोबर पवारसाहेबांची बंद दरवाज्याआड खलबतं झाली..अर्थात समन्वय समिती स्थापन करुन दर महिन्याला त्याची बैठक घेतली जाईलं हे जाहीर करुन आम्ही आता समाधानी आहोत, तिढा सुटलेला आहे हे दोन्ही बाजूनी सांगण्यात आलं..हे एवढं रामायण पवारसाहेबांनी फक्त एका समन्वय समितीसाठी केलं असेल असं वाटत नाही..अगदी पवारांना जवळून ओळणाऱ्यांनाही हे काही पटलं नाही.. याचाच अर्थ पवार मांगे समथिंग मोअर..असाच आहे..कारण पवारसाहेबांसारखा जाणता राजा एखाद्या फुटकळ समितीसाठी असा नाराज होऊन बसणारा नेता नाही...त्यामुळे पवारांच्या नाराजीमागं काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न सुरु झालाय....
शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली त्यामागं एक कारण होतं...तारिक अन्वर यांना राज्यसभेचा उपसभापती करण्याची मागणी..पण काँग्रेसनंही त्यांची दखल घेतली नाही..तर पवारांनी सोनिया गांधी आणि पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात..राज्यपाल नियुक्त्या, विविध समित्यांवरील नियुक्त्या करताना काँग्रेसनं घटक पक्षांना विचारात घ्यावं अशी मागणी केल्याचं कळतय..हे सगळं ठिक आहे.. पण त्यासाठी अचानक नाराजी आणि सरकारमधून बाहेर पडण्याचा इशारा देण्याची गरज नव्हती...नाहीतर पवारसाहेब म्हणजे काही ममता बॅनर्जी नाहीत उठसुठं काहीही मागणी करायची आणि धमक्या इशारे द्यायचे..त्यातच पवारांचे फक्त 9 खासदार आहेत..एवढ्या छोट्या ताकदीवर पवारसाहेब मोठं धाडस करत नाहीत...मग पवारसाहेबांची नाराजी कशात आहे...
मॅडम, काय हे ?
पवारसाहेबांची नाराजी ज्यावेळी बाहेर आली.. त्याच्या दोन दिवस अगोदरच काँग्रेसचे युवराज राहुल गांधी यांनी आपण महत्वाची जबाबदारी स्विकारण्यास तयार असल्याचं जाहीर केलं होतं.. याचाच अर्थ 2014 च्या लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन युवराजांना पक्षात आणि सरकारमध्ये मोठी जबाबदारी दिली जाणार.. प्रवण मुखर्जी राष्ट्रपती झाल्यानंतर सेवाज्येष्ठता डावलल्याचा पवारांना राग येऊ शकतो..त्यातच राज्यातले नेते सुशिलकुमार शिंदे यांना गृहमंत्री किंवा लोकसभेचा सभागृह नेता करण्याचा काँग्रेसचा विचार आहे..शिंदे हे पवारांना ज्युनिअर आहेत. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणंही पवारांना रुचणार नाही..तर दुसरीकडं युवराज सक्रिय झाल्यानंतर पंतप्रधान आणि राहुल गांधी यांच्यात विचारविनिमय वाढणार मगं आपली ज्येष्ठता धोक्यात येऊ शकते असाही एक विचार आहे...तर लवासासारख्या प्रकल्पाला केंद्रातील काँग्रेसचे मंत्रिच खोडा घालत आहेत हेही पवारांना रुचलेलं नाही..हे झालं दिल्लीतलं....
राज्यातही पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री झाल्यापासून राष्ट्रवादीची गोची झालीय..महत्वाची सर्व खाती राष्ट्रवादी कडे आहेत तरीही निर्णय प्रक्रियेत मुख्यमंत्री खूपच वेळ घेतात हा त्यांचा आक्षेप आहे..काँग्रेस पक्षातले अनेक आमदारही मुख्यमंत्र्यांच्या या निर्णय न घेण्याच्या भूमिकेवर नाराज आहेत..तर राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेल्या जलसंपदा विभागाच्या मागे मुख्यमंत्री हात धूवून  लागलेत.. जलसंपदा विभागावर 70 हजार कोटी खर्च झाले पण सिंचन फक्त 1 टक्काही नाही यावरुन हा पैसा कुठं मुरला यासाठी श्वेतपत्रिका काढण्याचा मुख्यमंत्र्यांनी चंगच बांधलाय..तर मंत्रालयासह त्या परिसरात असलेले मंत्र्यांचे बंगले यांचा मेकओव्हर करण्याचा भुजबळांचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे..त्यालाही मुख्यमंत्र्यांनी विरोध केलाय..हे सर्व होत असताना  पवारसाहेबांनी मुख्यमंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर जाहीरपणे टीका केलीय..त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण नको, त्यांना हाकला असाच सुर राष्ट्रवादीतून निघत आहे तर दुसरीकडं काँग्रेसमध्येही मुख्यमंत्री चव्हाणांबदद्ल मोठी नाराजी आहे..तीसुद्धी बाहेर आलीच आहे.त्यातच आदर्श प्रकरणी काँग्रेसचे तीन माजी मुख्यमंत्री अडचणणित आहेत..या सर्व पार्श्वभूमिवर मुख्यमंत्री हटाव हाच विचार असण्याची एक शक्यता आहे..तर राहुल गांधींच्या सक्रिय होण्याचाही दुसरा मुद्दा असू शकतो.. त्यामुळे पवारांनी वेळीच फासे टाकलेलं आहेत..बंद दरवाज्याआड काय चर्चा झाली हे समजणं सध्यातरी शक्य नसलं तरी पवारांनी टाकलेले फासे त्यांना फायद्याचे ठरतात, का काँग्रेस हेच फासे पवारांवर उलटवतात ह्यासाठी दोन तीन महिन्यांचा कालावधी तरी जाऊ द्यावा लागेल.त्यानंतर पवारसाहेबांच्या नाराजीमागं काय दडलंय हे होणाऱ्या राजकीय फेरबदलानंतर कळू शकेल..  

1 comment:

  1. changala lekh, pun janata raajaa kasala mhanata ? bharatatala sagalyat corrupt politician aahe haa maanus.

    desh vikun khatoy, yachi jaga 2 no naahi turungaat aaahe

    ReplyDelete