Friday, March 16, 2012

टीव्हीवरची वाढती अश्लिलता..

टीव्ही आता सर्वांच्या घरात पोचलाय. त्यामुळे त्याचं महत्वही वाढलय. जसं महत्व वाढलय तसच त्यावर दाखवल्या जाणा-या कार्यक्रमावर टीकाही वाढलीय..काल परवापर्यंत "" ची बाराखडी चाललेली होती. सास- बहू यांच्यातला कलगीतुरा नाहीतर रडारडीच्या मालिकांची रेलचेल होती..त्यात भर पडली ती लफडी, घरातले वाद, अशा विषयांची..एका मालिकेत तर कोणाच्या बायकोचं कोणाबरोबर लफडय आणि कोणाचा नवरा कोणाबरोबर लफडी करतोय हेच कळत नाही..ही लफडेबाजीही जोरात सुरु होती. काही मालिका तर वर्षानुवर्षे त्या जागेवरुन हलतही नाहीत.."चार दिवस...." म्हणत किती वर्षे झाली तरी मालिका काही संपण्याचं नाव घेत नाही. त्यातली पात्रं बदलली, कलाकार बदलले तरीही अजून चार दिवस म्हणत ह्या मालिका अजूनही दाखवल्या जातातच...टीव्हीवालेही टीआरपी मिळतोय ना ! म्हणत त्या बंद करण्याचं धाडस दाखवत नाहीत. शेवटी टीव्हीवाल्यांना पैसा कमावायचा आहे त्यामुळे तेही लोकांची पसंती म्हणजे टीआरपी आहे तोपर्यंत अशा मालिका बदलण्याच्या भानगडीत पडत नाहीत. त्यात रिऍलिटी शोची भर पडली. मग काय एकामागोमाग रिऍलिटी शो चा भरणा..कोणतंही चॅनल लावा लिटल चॅम्प..डान्स, गौरव ह्याचा त्याचा असं म्हणत सगळीकडं एकच सुर..त्यानंतर कॉमेडीला लोक पसंती देतात असं दिसलं की सगळ्या चॅनलवर कॉमेडीचा धुमाकुळ...हे सगळं सुरु असताना सोनी टीव्हीनं तर धमालच केली.."बडे अच्छे लगतो है" या मालिकेत त्यांनी चक्क किसिंग सीन दाखवला..त्याचवेळी या मालिकेतला राम आणि साक्षी यांच्यातला लव्ह मेकिंग सीनही दाखवण्यात आला. टीव्हीवर असे बोल्ड सीन दाखवल्यानं चर्चा तर होणारच. हा बोल्डपणा काहीजणांना आवडला तर ब-याचजनांनी त्यावर सडकून टीकाही केली. विशेषतः महिला वर्गांनी त्यावर टीकास्त्र सोडलं. तर टीआरपीच्या नावानं टीव्ही निर्माते काहीही दाखवतात असाही सुर निघाला..पण हा बोल्डपणा टीव्हीवर काही पहिल्यांदाच आलेला नाही..बीग बॉसमध्येही अश्लिल दृशं दाखवण्यात आलीच होती. राहुल महाजन, पायल रोहतगी यांचे स्विमिंग पुलावरचे चाळे, त्यांचं अंगचटीला येण्याचे सीनही दाखवले होतेच की. त्यानंतरही अश्लिल म्हणता येतील असे अनेक सीन टीव्ही मालिकांत दाखवण्यात आले..

आता प्रश्न असा आहे की टीव्हीवर असे सीन दाखवावे का..? तर अनेकजण म्हणतीत त्यात काय विशेष. सर्वच ठीकाणी तर असे सीन दाखवले जातात. मग टीव्हीवर दाखवले तर बिघडले कुठे..? आणि दुसरा पक्ष म्हणेल नाही. टीव्हीवर तरी अश्लिल दृशं दाखवताना काळजी घेतली पाहिजे..दोन्हीही बाजू त्यांच्या त्यांच्या जागी बरोबर असल्या तरी टीव्ही वरच्या दृशांमध्ये लिप लॉक सिन वगैरे दाखवणं तसं योग्य नाही..घरातली सर्व मंडळी टीव्ही एकत्र बसून पाहतात, त्यामुळे असे सीन पाहताना त्यांनाही अवघडल्यासारखं होतं. त्यातच लहान मुलांवर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे असे सीन टाळले जावेत असेच संकेत आहेत. पण टीव्हीवरच्या कार्यक्रमांनीही आता बोल्ड होण्याचं ठरवल्यामुळे त्यावर नियंत्रण आणणं अवघड आहे..चित्रपटाला सेन्सॉर आहे पण टीव्ही मालिकांना अजून नाही..त्यातच ज्या "बडे अच्छे लगते है" या मालिकेत हे किसिंग आणि लव्ह मेकिंग दाखवण्यात आलय. त्या मालिकेची निर्माती आहे एकता कपूर. तिच्या डर्टी पिश्चरला मोठं यश मिळालं म्हणून कदाचित तीनं तोच प्रकार टीव्हीवर कॅश करण्याचा विचार केला असेल. पण एकता सारख्या निर्मातीनं सिनेमा आणि टीव्ही यात फरक करायला हवा.

टीव्ही वरच्या अनेक कार्यक्रमांमद्ये बोल्डपणा वाढलाय. पण बडे अच्छे लगते है मधला हा बोल्डपणा जरा जास्तच झाला. अर्थात लोकांची अभिरुची बदलत आहे असं निर्मात्याचं म्हणणं असलं तरी मनोरंजनाच्या नावाखाली आपण काय विकतोय याचं भानही त्यांना हवं..फक्त टीआरपी वाढवायचा म्हणून काहीही दाखवणं हे त्यांना शोभत नाही..टीव्हीवर रिऍलिटी शो, कॉमेडी शो, आणि सासू सुनांच्या मालिकांमधून वेगळं काही देण्याच्या नादात निर्माते बोल्ड सीन दाखवण्याचा नवा पायंडा पाडत आहेत..पण सामाजिक भान ठेऊन निर्मात्यांनी हा बोल्डपणा टाळला पाहिजे.. त्यावर कोणाला अश्लिलतेची व्याख्या काय वगैरे प्रश्न पडले तर त्यांनी खुशाल विचारावेत..कारण हा वाद नवा नाही..यापूर्वीही अश्लिलतेच्या व्याख्येवर चर्चा झालीय. त्यामुळे त्यात फारसं खोलात मी जात नाही..पण घरात आपण आपले आई वडील, बायको आणि मुलांबरोबर जे दृश्य पाहताना आपल्याला संकोच वाटतो ते अश्लिल अशी सोपी व्याख्या त्याची आहे. त्यामुळे टीव्हीवाल्यांनी असा अश्लिलतेचा आधार घेऊन आपली मालिका चालवण्याचा धंदा बंद करावा..याच अश्लिलतेच्या वादातून टीव्हीवरच्या काही जाहिरातीसुद्धा मध्यंतरी वादग्रस्त ठरल्यात. शेवटी त्या दाखवण्यास सरकारनं आक्षेप घेवून कारवाईचा बडगा उगारला तेंव्हा त्या जाहीराती मागं घेण्यात आल्या. त्यामुळे कारवाईचा बडगा उगारण्यापेक्षा टीव्ही निर्मात्यांनीच स्वतः काही मर्यादा पाळल्या तर योग्य होईलं त्यातून चांगलाच संदेश जाईल यात शंका नाही..पण क्रिएटीव्हीटी किंवा कथेची मागणी हे फालतू कारण देऊन काहीही दाखवणं थांबवावं हीच अपेक्षा...

No comments:

Post a Comment