Saturday, September 3, 2011

ईटीव्ही गणेशोत्सव मंडळ




दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आम्ही ईटीव्ही मराठीच्या हैदाराबदच्या डेस्कवर गणपती बाप्पांची स्थापना केली. मागच्या अकरा वर्षापासून आम्ही ही परंपरा जोपासत आलो आहोत. ईटीव्ही मराठीला सुद्धा मागच्या महिन्यात अकरा वर्ष पूर्ण झाली. पहिल्या गणपतीची स्थापना करताना व्यवस्थापनाच्या कडक नियमांचा नाही म्हटले तरी फटका बसलाच होता..कारण इतर भाषीक लोकही त्यांचे सण असेच कार्यालयात साजरे करायला लागले तर काय करायचे असा प्रश्न उपस्थित केला जात होता. पण त्यातून शेवटी निर्णय झाला. वरच्या पातळीवरुनही गणपती डेस्कवर बसवण्यास परगानगी मिळत गेली..या अकरा वर्षात अनेक सहकारी आले आणि गेले पण आम्ही आजही ही परंपरा जोपासत आहेत. आपल्या राज्यातून परराज्यात नोकरी करण्यास आलेल्यांना त्यांच्या सण उत्सव परंपरा याचा विसर पडू नये आणि अशा उत्सवाचा आनंदही मिळावा ही त्यामागची भावना..त्यातच महाराष्ट्राबाहेर हा गणेशोत्सव साजरा करण्याची मजा काही औरच आहे. दररोज दोनवेळा आम्ही या गणेशाची विधिवत पूजा करतो..जे सहकारी ईटीव्ही सोडून गेले त्यांना गणशोत्सवाची आठवण झाल्यानंतर त्यांना नक्कीच ईटीव्ही गणेशोत्सव आणि त्याच्याशी त्यांच्या जोडलेल्या आठवणी नक्कीच जाग्या होतील. हैदराबादमध्ये काम करणारे अनेक सहकारी हे बॅचलर असल्यामुळे त्यांना होम सिक होऊ नये हासुद्धा त्यामागचा हेतू.. सुरवातीला हैदराबादमधलीच गणपतीची मूर्ती आम्ही घेत असू पण त्यामुर्तीत जी प्रसन्नता हवी ती दिसत नसावी..म्हणून नंतर पेणचा गणपती आणण्यास सुरवात झाली..मागच्या तीन चार वर्षापासून आम्ही पर्यावरणाचा विचार करुन इको फ्रेंडली बाप्पाची मुर्ती मुंबईतूनच मागवतो..त्यामुळे आम्ही फक्त बातम्यातूनच पर्यावरणाचा संदेश देऊन थांबत नाही तर आमच्या कृतीतूनही आम्ही तो दाखवतो..हा आमचा बाप्पा सर्वांना आरोग्यमय आयुष्य देवो आणि त्यांच्या इच्छा पूर्ण करो हीच श्रींच्या चरणी प्रार्थना...

1 comment:

  1. गणपती बाप्पा मोरया. काका तुमचा ब्लॉग वाचून प्रत्यक्ष हैदराबादच्या डेस्कवर आल्याचा अनुभव झाला. आता लवकरच आलमपनाहमधली पार्टीही अशीच ब्लॉगवर शेअर करा. मजा येईल. हैदराबादच्या गणेशोत्सवाची मजा कुठेच नाही. मिस यू ई टीव्ही.

    ReplyDelete